हिंदू दिनदर्शिका
Appearance
(मास या पानावरून पुनर्निर्देशित)
हिंदू दिनदर्शिकेत पुढील बारा महिने आहेत.
महिन्यांच्या नावांची व्युत्पत्ती
[संपादन]प्रत्येक महिन्यांची नवे ही त्या त्या महिन्याच्या पौर्णिमेस किंवा पौर्णिमेच्या मागे पुढे येणाऱ्या नक्षत्राच्या नावावरून त्या महिन्याचे नाव पडलेले आहे.
नक्षत्राचे नाव | महिना |
---|---|
चित्रा | चैत्र |
विशाखा | वैशाख |
जेष्ठा | जेष्ठ |
पूर्वाषाढा | आषाढ |
श्रवण | श्रावण |
पूर्वाभाद्रपदा | भाद्रपद |
अश्विनी | अश्विन |
कृतिका | कार्तिक |
मृगशीर्ष | मार्गशीर्ष |
पुष्य | पौष |
मघा | माघ |
पूर्व फाल्गुनी | फाल्गुन |
हिंदू कालगणना
[संपादन]हिंदू धर्मामध्ये नऊ प्रकारे कालगणना केली जाते. १.ब्राह्म, २.दिव्य, ३.पित्र्य, ४.प्राजापत्य, ५.बार्हस्पत्य, ६.सौर, ७.सावन, ८.चांद्र, ९.नाक्षत्र,
वर्ष, अयन, ऋतू, युग, इत्यादींची गणना सौरमानावरून करतात. महिना व तिथींची गणना चान्द्रमानावरून करतात. वार, सांतपनादी कृच्छ्रे, सोहेर-सुतक यांचे दिवस, वैद्यचिकीत्सादिन यांची गणना सावन मनावरून करतात. घटिकादिंची गणना नक्षत्रमानावरून करतात.