Jump to content

पंजाब नॅशनल बँक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पंजाब नॅशनल बँक
प्रकार सार्वजनिक (BSE, NSE:PNB)
स्थापना लाहोर, १८९५
मुख्यालय

नवी दिल्ली, भारत

7 भिकाएजी कामा प्लेस न. दिल्ली
सेवांतर्गत प्रदेश बँकिंग
विमा
शेअर बाजार आणि संबंधित
उत्पादने ऋण, क्रेडिट कार्ड, बचत, गुंतवणूक, विमा इत्यादि.
कर्मचारी ५८,३००
संकेतस्थळ www.pnbindia.com

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) ही भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीयीकृत बँक आहे.ची नोंदणी भारतीय कंपनी अधिनियमांतर्गत 19 मे 1894 रोजी झालेली होती. लाहोरमधील अनारकली बाजार येथे बँकेचे तेव्हाचे मुख्य कार्यालय होते. भारतातील द्वितीय क्रमांकाची सरकारी मालकीची व्यावसायिक बँक. देशभर 764 शहरांतून पसरलेल्या 5001 पूर्णतया संगणकिकृत व सीबीएस् छत्राखालील SOLs द्वारे अदमासे 37 दशलक्ष ग्राहकांस बँकिंगसेवा ही बँक पुरवीत आहे. बँकर्स अल्मनॅक, लंडन यांनी बँकेस जागतिक पातळीवरील 248 वी भव्य बँक म्हणून निर्देशित केलेले आहे.

इतिहास

1895: पीएनबीची Lahore येथे स्थापना. देशी व्यवस्थापन, देशी भांडवलावर सुरू झालेली व आजवर टिकून असलेली पहिली स्वदेशी बँक हे पीएनबीचं अद्वितीयत्व. (1881: मध्ये फैजाबाद येथे स्थापित अवध कमर्शियल बँक ही संपूर्ण भारतीय बँक 1958 मध्ये गुंडाळली गेली.) दयाल सिंग मंजिठिया, लाला हरकिशन लाल, लाला लालचंद, श्री कालीप्रसन्न राय,श्री इ. सी. जेसावाला, श्री प्रभू दयाल, बक्षी जैशीराम, लाला ढोलन दास असे स्वदेशीचळवळीचे अध्वर्यू नेते पीएनबीच्या स्थापनेत सहभागी होते. लाला लजपतराय हे बँकेच्या व्यवस्थापनात अग्रेसर होते.

1904: कराची आणि पेशावर येथे बँकेच्या शाखा सुरू.

1940: भगवानदास बँकेचे पीएनबीत विलीनीकरण.

1947: भारताची फाळणी . लाहोरमधली बँकेची इमारत गमावली, पण पाकिस्तानात व्यवसाय चालू.

1951: 39 शाखांची भारत बँक पीएनबीमध्ये विलीन

1961: यूनिव्हर्सल बँक ऑफ इंडिया पीएनबीमध्ये विलीन.

1963: ब्रह्मदेश सरकारने पीएनबीच्या रंगून शाखेचे राष्ट्रीयीकरण केले.

सप्टेंबर 1965:भारत पाक युद्धानंतर पाकिस्तान सरकारने भारतीय बँकांच्या सर्व शाखा जप्त केल्या.त्यात पीएनबीने आपले मुख्य कार्यालय व पूर्व पाकिस्तानातल्या कांही शाखा गमावल्या.

1960s: इंडो कमर्शियल बँक पीएनबीत विलीन.

1969: दि.19 जुलै - भारतसरकारने पीएनबीसहित13 प्रमुख बँकांचे राष्ट्रीयीकरण केले

1976 : पीएनबीची शाखा लंडनमध्ये उघडली.

1986: हिंदुस्तान कमर्शियल बँकेचे (स्था.1943) पीएनबीत विलीनीकरण. 142 शाखांनी पीएनबीच्या शाखाविस्तारात वाढ.

1993: 1980 साली राष्ट्रियीकृत झालेल्या “न्यू बँक ऑफ इंडियाचे” पीएनबीत विलीनीकरण.

1998: अलमाटी, कझाकस्तान येथे प्रातिनिधिक कार्यालय उघडले.

2003: केरळमधील अत्यंत जुनी नेदुंगडीबँक पीएनबीने ताब्यात घेतली. यावेळी नेदुंगडी बँकेच्या शेअर्सची किंमत शून्य होउन गेलेली होती. परिणामी, त्या बँकेच्या शेअरधारकांना कांहीही मोबदला मिळाला नाही. याच वर्षी बँकेने लंडन येथे प्रातिनिधिक कार्यालय उघडले.

2005: काबुल, अफगाणिस्तान व शांघाय, चीन येथे बँकेची शाखा सुरू झाली.

एव्हरेस्टबँक, नेपाळ सोबत बँकेने सहकार्य करार केला. त्या करारान्वये भारत व नेपाळमधील एव्हरेस्ट बँकेच्या 12 शाखांदरम्यान पेसै अंतरित करणे सुकर झाले.

2005: बँकेने दुबई येथे प्रातिनिधिक कार्यालय उघडले

2007: इंग्लंडमध्ये पीएनबीआयएलची स्थापना. लंडन व साउथहॉल अशा दोन शाखा उघडल्या. नंतर लीसेस्टर येथे शाखा सुरू केली असून आणखी बर्मिंगहॅम येथे चौथ्या शाखेचे नियोजन आहे.

2008: पीएनबीची शाखा हॉंगकॉंग मध्ये उघडली.

2009: बँकेने ओस्लो, नॉर्वे येथे प्रातिनिधिक कार्यालय उघडले. कोवलून येथे हॉंगकॉंगमधील दुसरी शाखा.

पंजाब नॅशनल बँकेचे कार्याध्यक्ष

  • 1895-1898 सरदार दयाळसिंह मंजिठिया
  • 1898-1905 रायबहादुर लाला लालचंद
  • 1905-1910 ईश्वरदास भगत
  • 1911-1912 रायबहादुर लाला लालचंद
  • 1912-1913 रायबहादुर लाला सुखदयाळ
  • 1913-1915 ईश्वरदास भगत
  • 1917-1920 डॉ. हीरालाल भाटिया
  • 1920-1931 लाला धनपतराय
  • 1931-1937 डॉ. महाराज कृष्णकपूर
  • 1938-1942 रायबहादुर दीवाणदास
  • 1943-1953 लाला योधराज
  • 1953-1954 श्रीअंश पार्षद जैन
  • 1954-1959 शेठ शातिप्रकाश जैन
  • 1960-1964 रामनाथ गोएंका
  • 1964-1967 कमलनयन बजाज
  • 1968-1972 सोमेशचंद्र त्रिखा
  • 1972-1975 प्रकाशलाल टंडन
  • 1975-1977 तीर्थराम तुली
  • 1977-1980 ओमप्रकाश गुप्ता
  • 1980-1981 श्यामलाल चोपडा
  • 1981-1985 सुदर्शनलाल बलुजा
  • 1985-1990 कुंदनलाल अग्रवाल
  • 1990-2000 रशिद जिलानी
  • 2000–2005 एस एस कोहली
  • 2005-2007 एस सी गुप्ता
  • 2007-2009 कैलाशचंद्र चक्रवर्ती

फोर्ब्ज ग्लोबल 2000 रॅंकिंग

बँकेस 1243वे मानांकन प्राप्त झाले आहे. [१]

संदर्भ