रॉक संगीत
रॉक संगीत (इंग्लिश: Rock music) हा इ.स. १९६० च्या दशकादरम्यान अमेरिकेची संयुक्त संस्थाने व ब्रिटनमध्ये निर्माण झालेला संगीताचा एक प्रकार आहे. इ.स. १९४० च्या दशकातील रॉक अँड रोल संगीतामध्ये रॉक संगीताची पाळेमुळे मानली जातात. सध्या रॉक हा जगातील सर्वात लोकप्रिय संगीतप्रकार आहे [ संदर्भ हवा ].
विद्युत गिटार हे वाद्य रॉक संगीताचे मुख्य अंग आहे. त्याच्या जोडीला बास गिटार व ड्रम ही वाद्येदेखील वापरली जातात. रॉक चमूमध्ये गायक व संगीतकार ह्या दोन्ही कलाकारांचा समावेश असतो.
भारतीय संगीतक्षेत्रामध्येदेखील रॉक संगीताचे स्थान आढळते. विशेषतः कोलकाता, मुंबई व बेंगलुरू ह्या शहरांमध्ये अनेक रॉक बॅंड कार्यरत आहेत. उषा उथुप ही दक्षिण भारतीय गायिका रॉक संगीतावर गाणी म्हणत असे. तसेच द रोलिंग स्टोन्स, बीटल्स इत्यादी अनेक लोकप्रिय रॉक बॅंडांनी भारतीय शास्त्रीय संगीताचा आपल्या गाण्यांमध्ये समावेश केला आहे.
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- "१०० सर्वोत्तम रॉक आल्बम" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)