द क्राउन
ब्रिटिश-अमेरिकन टेलिव्हिजन नाटक मालिका | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | television series | ||
---|---|---|---|
मुख्य विषय | दुसरी एलिझाबेथ | ||
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
रचनाकार |
| ||
संगीतकार |
| ||
पटकथा |
| ||
निर्माता |
| ||
Performer |
| ||
वितरण |
| ||
भाग |
| ||
दिग्दर्शक |
| ||
प्रमुख कलाकार |
| ||
आरंभ वेळ | नोव्हेंबर ४, इ.स. २०१६ (Wolferton Splash) | ||
शेवट | डिसेंबर १४, इ.स. २०२३ | ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
द क्राउन ही दुसरी एलिझाबेथ च्या कारकिर्दीबद्दलची एक ऐतिहासिक नाट्य दूरदर्शन मालिका आहे, जी पीटर मॉर्गन यांनी मुख्यतः लिहीली आणि तयार केली. नेटफ्लिक्ससाठी लेफ्ट बँक पिक्चर्स आणि सोनी पिक्चर्स टेलिव्हिजनद्वारे ही निर्मित आहे. मॉर्गनने हे चित्रपट द क्वीन (२००६) आणि त्याच्यावर आधारित नाटक द ऑडियंस (२०१३) मधून मालिका विकसित केली.
या मालिकेत १९४७ मध्ये राजकुमारी एलिझाबेथ आणि फिलिप माऊंटबॅटन यांच्या लग्नाच्या काही काळापूर्वी सुरुवात होते आणि प्रिन्स चार्ल्स व कॅमिला पार्कर बॉल्स यांच्या २००५ मध्ये झालेल्या लग्नापर्यंत जवळजवळ सहा दशके ह्यात दाखवली आहे.[१] ह्याचे सहा सत्र आहे. मालिकेतील प्रमुख कलाकार दर दोन सत्रात बदलले गेले आहेत; उदाहरणार्थ, एलिझाबेथची भूमीका पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात क्लेअर फॉय, तिसऱ्या आणि चौथ्या सत्रात ऑलिव्हिया कोलमन आणि पाचव्या आणि सहाव्या सत्रात इमेल्डा स्टॉन्टनने साकारली होती.[२][३]
अभिनय, दिग्दर्शन, लेखन, चित्रीकरण आणि निर्मिती मूल्यासाठी समीक्षकांनी द क्राउनची प्रशंसा केली आहे. तथापि, त्याच्या ऐतिहासिक चुकांची टीका देखील केली गेली आहे, विशेषतः मालिकेच्या उत्तरार्धात. या मालिकेने उत्कृष्ठ नाटक मालिकेसाठी प्राइमटाइम एमी पुरस्कार [४]आणि सर्वोत्कृष्ट टेलिव्हिजन मालिका-नाटकासाठी दोन गोल्डन ग्लोब पुरस्कारांसह अनेक पुरस्कार जिंकले आहेत.[५]
कथानक
[संपादन]ही मालिका दुसती एलिझाबेथच्या १९४७ मध्ये तिच्या लग्नापासून ते २१ व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंतचे जीवन चित्रित करते:[१][२][६]
- पहिल्या सत्रामध्ये १९४७ ते १९५५ या कालावधीचा समावेश आहे, ज्यात जॉर्ज सहाव्याच्या मृत्यूनंतर एलिझाबेथचे पदग्रहण, विन्स्टन चर्चिल यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देणे आणि राणीची बहीण राजकुमारी मार्गारेटने पीटर टाऊनसेंडशी लग्न न करण्याचा निर्णय घेते.[७]
- दुसऱ्या सत्रामध्ये १९५६ ते १९६४ या काळात सुएझ संकट, अँथोनी इडन आणि हॅरल्ड मॅकमिलन यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामा, प्रोफ्युमो प्रकरण आणि प्रिन्स अँड्र्यू आणि प्रिन्स एडवर्ड यांचा जन्म या घटणांचा समावेश आहे.[८][९][१०]
- तिसऱ्या सत्रात १९६४ ते १९७७ चा समावेश आहे, ज्यात हॅरल्ड विल्सन आणि एडवर्ड हीथचे पंतप्रधान म्हणून कार्यकाळ, कॅमिला शँडचा परिचय आणि राणीचा रौप्य महोत्सव यांचा समावेश आहे.[११][१२]
- चौथ्या सत्रामध्ये १९७९ ते १९९० या काळात मार्गारेट थॅचरचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ आणि लेडी डायना स्पेन्सर आणि चार्ल्स, प्रिन्स ऑफ वेल्स यांचा विवाह यांचा समावेश आहे.[१३]
- पाचव्या सत्रात १९९१ ते १९९७ या कालावधीचा समावेश आहे ज्यात चार्ल्स आणि डायना यांच्या वैवाहिक जीवनातले प्रश्न आणि परिणामी त्यांचा घटस्फोट, तसेच अल-फयद कुटुंबाचा उदय आणि १९९२ च्या राणीच्या " अनस हॉरिबिलिस " वर लक्ष केंद्रित करते.
- टोनी ब्लेअरच्या काळातील सहाव्या आणि अंतिम सत्र आहे जो १९९७ ते २००५ आहे. पहिल्या चार भागांमध्ये डायनाचा मृत्यू आणि शेवटच्या सहा भागांमध्ये एलिझाबेथचा सुवर्ण महोत्सव, राजकुमारी मार्गारेट आणि क्वीन एलिझाबेथ द क्वीन मदर यांचा मृत्यू, प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटन यांचे सुरुवातीचे नाते आणि प्रिन्स चार्ल्स आणि कॅमिला पार्कर बाउल्सचे लग्न यांचा समावेश आहे.
भाग
[संपादन]सत्र | एपिसोड | पहिले प्रसारण |
---|---|---|
१ | १० | ४ नोव्हेंबर २०१६ |
२ | १० | ८ नोव्हेंबर २०१७ |
३ | १० | १७ नोव्हेंबर २०१९ |
४ | १० | १५ नोव्हेंबर २०२० |
५ | १० | ९ नोव्हेंबर २०२२ |
६ | ४ | १६ नोव्हेंबर २०२३ |
६ | १४ डिसेंबर २०२३ |
पात्र
[संपादन]- दुसरी एलिझाबेथ - क्लेअर फॉय (सत्र १-२), ऑलिव्हिया कोलमन (सत्र ३-४), आणि इमेल्डा स्टॉन्टन (सत्र ५-६)
- प्रिन्स फिलिप, ड्यूक ऑफ एडिनबर्ग - मॅट स्मिथ (सत्र १-२), टोबियास मेंझीस ((सत्र ३-४), आणि जोनाथन प्राइस (सत्र ५-६)
- राजकुमारी मार्गारेट (स्नोडेनची काउंटेस) - व्हेनेसा किर्बी (सत्र १-२), हेलेना बोनहॅम कार्टर (सत्र ३-४), आणि लेस्ली मॅनव्हिल (सत्र ५-६)
- टेकची मेरी - आयलीन ऍटकिन्स (सत्र १)
- अँथोनी इडन - जेरेमी नॉर्थम (सत्र १-२)
- राणी एलिझाबेथ (राणीची आई) - व्हिक्टोरिया हॅमिल्टन (सत्र १-२), मॅरियन बेली (सत्र ३-४), आणि मार्सिया वॉरेन (सत्र ५-६)
- लुई माउंटबॅटन - ग्रेग वाईज (सत्र १-२) आणि चार्ल्स डान्स (सत्र ३-४)
- युनायटेड किंग्डमचा सहावा जॉर्ज - जेरेड हॅरिस (सत्र १-२)
- विन्स्टन चर्चिल - जॉन लिथगो (सत्र १,२,३)
- युनायटेड किंग्डमचा आठवा एडवर्ड - ॲलेक्स जेनिंग्ज (सत्र १, २ ५) आणि डेरेक जेकोबी (सत्र ३)
- वॉलिस सिम्प्सन - लिया विल्यम्स (सत्र १, २ ५) आणि जेराल्डिन चॅप्लिन (सत्र ३)
- हॅरल्ड मॅकमिलन - अँटोन लेसर (सत्र २)
- हॅरल्ड विल्सन - जेसन वॅटकिन्स (सत्र ३)
- राजकुमारी ॲन - एरिन डोहर्टी (सत्र ३,४) आणि क्लॉडिया हॅरिसन (सत्र ५,६)
- युनायटेड किंग्डमचा तिसरा चार्ल्स - जोश ओ'कॉनर (सत्र ३,४) आणि डॉमिनिक वेस्ट (सत्र ५,६)
- डायना (राजकुमारी) - एम्मा कोरीन (सत्र ४) आणि एलिझाबेथ डेबिकी (सत्र ५,६)
- मार्गारेट थॅचर - गिलियन अँडरसन (सत्र ४)
- राणी कॅमिला - एमर्लड फेनेल(सत्र ३,४) आणि ऑलिव्हिया विल्यम्स (सत्र ५,६)
- जॉन मेजर - जॉनी ली मिलर (सत्र ५)
- टोनी ब्लेअर- बर्टी कार्वेल (सत्र ५,६)
- मोहम्मद अल-फयद - सलीम डॉ (सत्र ५,६)
- वेल्सचा राजकुमार विल्यम - एड मॅकवे (सत्र ६)
- राजकुमार हॅरी - लूथर फोर्ड (सत्र ६)
- कॅथरीन एलिझाबेथ मिडल्टन - मेग बेलामी (सत्र ६)
- बिली ग्रॅहाम - पॉल स्पार्क्स (सत्र २)[१४]
- जॉन एफ. केनेडी - मायकेल सी. हॉल (सत्र २)
- जॅकेलिन ली केनेडी-ओनासिस - जोडी बाल्फोर (सत्र २)
- लिंडन बी. जॉन्सन - क्लेन्सी ब्राउन (सत्र ३)
- एडवर्ड हीथ - मायकेल मॅलोनी (सत्र ३)
- बॉब हॉक - रिचर्ड रॉक्सबर्ग (सत्र ४)
संदर्भ
[संपादन]- ^ a b Singh, Anita (19 August 2015). "£100m Netflix Series Recreates Royal Wedding". The Daily Telegraph. 22 March 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 November 2016 रोजी पाहिले.
- ^ a b Ravindran, Manori (31 January 2020). "'The Crown' Will End After Season 5 With Imelda Staunton as Queen Elizabeth". Variety. 31 January 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 31 January 2020 रोजी पाहिले.
- ^ Taylor, Derrick Bryson (9 July 2020). "Netflix Renews 'The Crown' for a Sixth Season After All". The New York Times. ISSN 0362-4331. 9 July 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 December 2020 रोजी पाहिले.
- ^ "The Crown". Television Academy. 7 August 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 August 2020 रोजी पाहिले.
- ^ "Crown, The". www.goldenglobes.com. 2 April 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 6 January 2020 रोजी पाहिले.
- ^ Taylor, Derrick Bryson (9 July 2020). "Netflix Renews 'The Crown' for a Sixth Season After All". The New York Times. ISSN 0362-4331. 9 July 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 December 2020 रोजी पाहिले.
- ^ Smith, Russ (13 December 2016). "The Crown: What year did Series 1 finish? What will be in season 2?". Daily Express. 26 January 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 January 2018 रोजी पाहिले.
- ^ Sandwell, Ian (23 January 2017). "Downton Abbey's Matthew Goode is joining the cast of Netflix's The Crown". Digital Spy. 23 September 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 January 2017 रोजी पाहिले.
- ^ Tartaglione, Nancy (9 February 2017). "'The Crown' Adds Michael C Hall & Jodi Balfour As Jack & Jackie Kennedy". Deadline Hollywood. 25 May 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 9 February 2017 रोजी पाहिले.
- ^ Maslow, Nick (20 January 2018). "The Crown: Paul Bettany in talks to play Prince Philip". Entertainment Weekly. 21 January 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 January 2018 रोजी पाहिले.
- ^ Fienberg, Daniel (4 November 2019). "'The Crown' Season 3: TV Review". The Hollywood Reporter. 5 November 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 November 2019 रोजी पाहिले.
- ^ "Meet the cast of The Crown season 3". RadioTimes. 17 November 2019. 14 November 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 November 2019 रोजी पाहिले.
- ^ Bentley, Jean (24 January 2018). "'The Crown' Season 3: All the Details (So Far)". The Hollywood Reporter. 26 January 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 January 2018 रोजी पाहिले.
- ^ "The Crown Season Two: Representation vs Reality". Netflix. 11 December 2017. 6 April 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 January 2018 रोजी पाहिले.