मार्च २१
Appearance
<< | मार्च २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
मार्च २१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ८० वा किंवा लीप वर्षात ८१ वा दिवस असतो.
ठळक घटना
[संपादन]चौदावे शतक
[संपादन]पंधरावे शतक
[संपादन]- १४१३ - हेन्री पाचवा, इंग्लंड इंग्लंडच्या राजेपदी
- १४२१ - बीग युद्धात इंग्रजांचा फ्रेंचांकडून पराभव.
- १४९२ - अलोंझो पेट्रो हा खलाशी कोलंबससोबत सागरसफरीला निघाला.
सतरावे शतक
[संपादन]- १६१० - राजा जेम्स प्रथम याचे इंग्लंडच्या लोकसभेला उद्देशून भाषण.
- १६९७ - झार पीटर महान यांच्या पश्चिम युरोप दौऱ्याची सुरुवात.
अठरावे शतक
[संपादन]- १७०२ - ऍन स्टुअर्ट राणी यांचे इंग्लंडच्या लोकसभेला उद्देशून भाषण.
- १७८८ - अमेरिकेच्या न्यू ऑर्लिअन्स शहरात आग लागून शहर भस्मसात.
- १७८८ - गुस्टास व्हेसा यांची चार्लोट राणीकडे आफ्रिकन गुलामांना मुक्त करण्याची याचिका.
- १७९० - थॉमस जेफरसन यांनी राष्ट्रपती जॉर्ज वॉशिंग्टन यांच्याकडे न्युयॉर्क येथे राज्याचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला.
- १७९१ - न्यू हॅम्पशायरयेथील कॅप्टन होपले यीस्टन अमेरिकन नौदलाचे पहिले समितीय अधिकारी झाले.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८०० - रोममधून पळ काढलेल्या ख्रिश्चन धर्मगुरूंनी बर्नाबा निकोलो मरिया लुइगी कियारामॉॅंतीला पायस पाचवा म्हणून पोपपदी राज्याभिषेक केला.
- १८०४ - नेपोलियनचा फ्रेंच नागरी कायदा स्वीकृत.
- १८२४ - कैरो येथील शस्त्रास्त्र कचरा आगारातील आगीत ४००० घोडे भक्ष्यस्थानी.
- १८३५ - चार्ल्स डार्विन आणि मेरियानो गोन्झालेस यांची पोर्टिलो पास येथे भेट.
- १८४३ - मॅसॅच्युसेट्स मधील भविष्यवेत्ता विल्यम मिलर याची या दिवशी जगबुडी होण्याची भविष्यवाणी.
- १८४४ - बहाई सनाची सुरुवात.
- १८५१ - कॅलिफोर्नियामध्ये योसेमिटी दरीचा शोध लागला.
- १८५७ - जपानची राजधानी टोक्योत भूकंप. १,०७,००० ठार.
- १८५९ - एडिनबर्ग येथे स्कॉटिश नॅशनल गॅलरीची स्थापना.
- १८५९ - झूऑलॉजिकल सोसायटी ऑफ फिलाडेल्फिया ही अमेरिकेतील पहिली प्राणिशास्त्रीय संघटनेची स्थापना.
- १८६० - अमेरिकेचा स्वीडन सोबत हस्तांतरण करार.
- १८६४ - लुईझियाना मधील हेंडरसन पर्वतावर युद्ध.
- १८६५ - बेंटनव्हिल युद्धाची समाप्ती.
- १८६६ - राष्ट्रीय सैनिक निवासांना अमेरिकन काँग्रेसची मान्यता.
- १८६८ - सोरोसिस या अमेरिकेतील पहिल्या व्यावसायिक महिला क्लबची न्यू यॉर्क येथे स्थापना.
- १८७१ - पत्रकार हेन्री स्टॅनली यांच्या सुप्रसिद्ध आफ्रिका शोधामोहिमेची सुरुवात.
- १८७१ - ऑट्टो फोन बिस्मार्क जर्मनीच्या चान्सेलरपदी.
- १८८५ - फेरीच्या दुसऱ्या फ्रेंच सरकारचा राजीनामा.
- १८८८ - लंडन येथे आर्थर पिनेरो यांच्या स्वीट लव्हेंडरचा पहिला खेळ.
- १८९० - ऑस्ट्रियन ज्यू समाजाला कायदेशीर मान्यता.
विसावे शतक
[संपादन]- १९०९ - अमेरिकेचे मोरान व मॅकफरलॅण्ड युरोपच्या पहिल्या सहा दिवसीय सायकल स्पर्धेचे विजेते.
- १९१३ - अमेरिकेच्या ओहायो प्रांतात पूराचे ४०० बळी.
- १९१८ - पहिले महायुद्ध - सॉमची दुसरी लढाई सुरू.
- १९२३ - अमेरिकेच्या आकाशवाणीवर पहिल्या परकीय भाषेच्या अभ्यासक्रमाचे प्रसारण.
- १९२४ - मास इन्व्हेस्टर्स फंड अमेरिकेचे पहिले म्युच्युअल फंड झाले.
- १९२५ - एडिनबर्गमधील मरेफिल्ड क्रीडांगणाचे उद्घाटन.
- १९२५ - इराणने खोर्शिदी सौर हिज्राह दिनदर्शिका स्वीकारली.
- १९२७ - ब्रिटिश नौदलाची माघार आणि गुमिंगडॅंग सैन्याचा शांघाईवर विजय.
- १९३३ - अॅडॉल्फ हिटलर, गोरिंग, ब्रुनिंग व जर्मन सैन्याच्या इतर उच्च अधिकाऱ्यांची बर्लिन येथे बैठक.
- १९३३ - जपानच्या हॉकोडर्ट येथील आगदुर्घटनेत १,५०० लोक मृत्युमुखी.
- १९३५ - पर्शियाचे इराण हे अधिकृतरीत्या नामकरण.
- १९४० - पॉल रेनॉ फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- १९४२ - जर्मनीचा माल्टावर जोरदार हल्ला.
- १९४३ - अॅडॉल्फ हिटलरवर प्राणघातक हल्ल्याचा असफल प्रयत्न.
- १९४३ - आठव्या ब्रिटिश सैन्यदलाचा ट्युनिशियाच्या मरेथ लाईन वर हल्ल्याला प्रारंभ.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - ब्रिटिश सैनिकांनी मांडले जपानी आधिपत्यातून मुक्त केले.
- १९५२ - अमेरिकेच्या आर्कान्सा, टेनेसी, मिसूरी, मिसिसिपी, अलाबामा व केंटकी प्रांतातील चक्रीवादळात ३४३ मृत्युमुखी.
- १९५८ - सोवियेत संघाची वातावरणीय अण्वस्त्र चाचणी.
- १९६० - दक्षिण आफ्रिकेतील वंशवादाविरुद्ध निदर्शने करणाऱ्या निःशस्त्र आंदोलकांवर पोलिसांचा गोळीबार. ६९ ठार, १८० जखमी.
- १९६२ - स्वनातीत गतीने प्रवास करणारा अस्वल हा पहिला प्राणी.
- १९६८ - इस्रायली सैन्याने पॅलेस्टिनी मुक्ती संघटनेवरील हल्ल्यासाठी जॉर्डन नदी ओलांडली.
- १९६९ - अमेरिकेची नेव्हाडा केंद्रावर अण्वस्त्र चाचणी.
- १९७१ - क्रिकेट खेळात जॉर्जटाऊन येथे भारताच्या सुनील गावस्करचे त्याच्या विक्रमी ३४ कसोटी शतकांपैकी पहिलेवहिले शतक, ११६ धावा.
- १९७५ - ३००० वर्षांनंतर इथियोपियातील राजेशाही समाप्त.
- १९७९ - इजिप्शियन संसदेची इस्रायेलशी शांतता करार करण्यास अविरोध मान्यता.
- १९८० - अमेरिकेने सोवियेत संघाच्या मॉस्को शहरात होऊ घातलेल्या बाविसाव्या ऑलिंपिक खेळांवर बहिष्कार टाकला.
- १९९० - नामिबिया दक्षिण आफ्रिकेपासून स्वतंत्र झाले; सॅम नुजाना राष्ट्राध्यक्ष.
- १९९१ - अमेरिकन नौदलाच्या दोन पाणबुडीविरोधी विमानांच्या टकरीत २७ जण समुद्रात बेपत्ता.
- १९९३ - डन्स स्कोट्सला पोप जॉन पॉल द्वितीयने संतपद बहाल केले.
एकविसावे शतक
[संपादन]- २००५ - मिनेसोटाच्या रेड लेक गावातील हायस्कूलमध्ये एका विद्यार्थ्याने १० व्यक्तींना गोळ्या घालून ठार मारले.
जन्म
[संपादन]- १८५४ - ऍलिक बॅनरमन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९१६ - बिस्मिल्ला खॉं, भारतीय सनईवादक.
- १९४६ - टिमोथी डाल्टन, इंग्लिश अभिनेता.
- १९७८ - राणी मुखर्जी, भारतीय अभिनेत्री.
मृत्यू
[संपादन]- १६१७ - पोकाहोन्टास, मूळ अमेरिकन स्त्री, पोव्हाटनची मुलगी.
- १८४३ - ग्वादालुपे व्हिक्टोरिया, मेक्सिकोचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- जागतिक वन दिवस.
- सलोखा दिन - ऑस्ट्रेलिया.
- मातृ दिन - इजिप्त, लेबेनॉन, जॉर्डन.
- स्वातंत्र्य दिन - नामिबिया.
- मानवी हक्क दिन - दक्षिण आफ्रिका.
- वंशभेद निर्मूलन दिन - संयुक्त राष्ट्रे.
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर मार्च २१ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
मार्च १९ - मार्च २० - मार्च २१ - मार्च २२ - मार्च २३ - (मार्च महिना)