तुमच्या कुटुंबातील डिव्हाइस iOS 27, iPadOS 27, macOS 27, watchOS 27 आणि visionOS 27 वर अपडेट करणे
जर तुम्ही तुमच्या कौटुंबिक शेअरिंग गटामधील मुलांसह आई वडील किंवा पालक असाल, तर तुम्ही तुमच्या कौटुंबिक शेअरिंग गटामधील सर्व पात्र डिव्हाइस iOS 27, iPadOS 27, macOS 27, watchOS 27 आणि visionOS 27 किंवा त्यानंतरच्या व्हर्जनवर अपडेट करून पुन्हा डिझाइन केलेल्या ’आईवडिलांच्या नियंत्रणांच्या’ अनुभवाचा लाभ घेऊ शकता. तुमच्या कुटुंबातील डिव्हाइस अपडेट केल्यानंतर, तुम्ही तुमची सध्याची ‘आईवडिलांची नियंत्रणे’ ट्रान्सफर करू शकाल किंवा नवीन सेट अप करू शकाल.
कोणत्या डिव्हाइसला अजून अपडेट करणे आवश्यक आहे ते पहा
तुम्ही तुमचे डिव्हाइस iOS, iPadOS, macOS, watchOS आणि visionOS च्या व्हर्जन 27 किंवा त्यानंतरच्या व्हर्जनवर अपडेट केल्यानंतर, तुम्ही आणि तुमच्या ‘कौटुंबिक शेअरिंग’ गटामधील इतर आई वडील किंवा पालकत्व स्वीकारलेल्या व्यक्ती तुमच्या कुटुंबातील कोणती डिव्हाइस अजूनही अपडेट करणे आवश्यक आहे हे पाहू शकाल. नंतर तुम्ही तुमच्या कुटुंबातील प्रत्येकासाठी नवीन ‘आईवडिलांची नियंत्रणे’ इन्स्टॉल करू शकता.
‘सेटिंग’ ॲपवर जा (किंवा Mac वर सिस्टीम सेटिंग), नंतर ‘कुटुंब’ सिलेक्ट करा.
‘कुटुंबाची डिव्हाइस बघा’ निवडा, त्यानंतर अपडेट करता येणाऱ्या डिव्हाइसच्या यादीचा रिव्ह्यू करा.
तुमच्या कुटुंबाची डिव्हाइस अपडेट करणे
‘सेटिंग’ ॲपवर जा (किंवा Mac वर सिस्टीम सेटिंगवर जा), नंतर ‘सामान्य’ सिलेक्ट करा.
‘सॉफ्टवेअर अपडेट’ निवडा, नंतर ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा.
तुमच्या कुटुंबातील डिव्हाइस अपडेट केल्यानंतर, तुम्ही तुमची सध्याची ‘आईवडिलांची नियंत्रणे’ ट्रान्सफर करू शकता किंवा नवीन सेट अप करू शकता. सेटिंगवर जा (किंवा Mac वर सिस्टीम सेटिंग), ‘कुटुंब’ सिलेक्ट करा, नंतर ‘सुरुवात करा’ वर क्लिक करा किंवा टॅप करा.
अधिक माहितीसाठी, तुमचा iPhone किंवा iPad अपडेट करणे, Mac वर macOS अपडेट करणे, तुमचे Apple Watch अपडेट करणे, किंवा तुमच्या Apple Vision Pro वर visionOS अपडेट करणे ह्यावर Apple सपोर्ट लेख पहा.
तुम्हाला अपडेट करायचे असलेल्या डिव्हाइसपैकी एक तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्य शोधू शकत नसाल, तर Apple सपोर्ट लेख तुमचे हरवलेले Apple डिव्हाइस किंवा AirTag शोधण्यासाठी ‘शोधाशोध’ ॲप वापरा पहा.
तुम्हाला अपडेटसाठी पात्र असलेले डिव्हाइस सापडत नसेल किंवा तुमच्याकडे ह्यापुढे त्याचा ॲक्सेस नसेल, तर तुम्ही ते तुमच्या Apple अकाउंटमधून काढून टाकू शकता. तुम्ही कुठे साइन इन केले आहे हे शोधण्यासाठी तुमच्या Apple अकाउंट डिव्हाइसची यादी तपासणे Apple सपोर्ट लेख पहा
जर तुम्ही काही डिव्हाइस अपडेट करू शकत नसाल
तुमच्या कुटुंबातील काही डिव्हाइस अपडेट केली जाऊ शकणार नाहीत. ह्या डिव्हाइसची यादी कशी बघायची ते येथे दिले आहे :
‘सेटिंग’ ॲपवर जा (किंवा Mac वर सिस्टीम सेटिंग), नंतर ‘कुटुंब’ सिलेक्ट करा.
'कौटुंबिक डिव्हाइस बघा' निवडा, नंतर 'लेगसी डिव्हाइस' निवडा.
अपडेट न करता येणारी डिव्हाइस अजूनही iOS 26, iPadOS 26, macOS 26, watchOS 26 किंवा त्यापूर्वीच्या व्हर्जनमधील स्क्रीन टाइम आणि कौटुंबिक शेअरिंग सेटिंग वापरू शकतात.
तुमच्या कुटुंबाने त्यांची डिव्हाइस अपडेट केल्यानंतर
तुम्ही तुमच्या कुटुंबातील सर्व डिव्हाइस अपडेट केल्यानंतर, आईवडिलांची नियंत्रणे सेट अप करण्यासाठी स्टेप बाय स्टेप मदत मिळवा किंवा तुमच्या अपत्याच्या डिव्हाइसवरील आईवडिलांची नियंत्रणे एक्सप्लोअर करा.