Jump to content

आल्प्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  आल्प्स पर्वत
आल्पेन (जर्मन)
आल्प्स
शामोनि व्हॅलीतून दिसणारा आल्प्स
देश ऑस्ट्रिया, फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली, स्लोव्हेनिया, लिश्टेनस्टाइन
सर्वोच्च शिखर मॉंट ब्लॅंक, इटली
उंची - ४,८०८ मी.
आल्प्स नकाशा
आल्प्स पर्वतरांग.
गॉट्टहार्ड बेस रेल्वे बोगदा हा जगातील सर्वात लांब बोगदा आल्प्समध्येच स्थित आहे.

ही युरोपामधील प्रमुख पर्वतरांग आहे. सुमारे १,२०० किमी विस्तार असलेली आल्प्स पर्वतरांग फ्रान्स, जर्मनी, इटली, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, स्लोव्हेनिया, लिश्टेनस्टाइनमोनॅको ह्या देशांमध्ये पसरली आहे. इटलीतील मॉंट ब्लॅंक हे आल्प्समधील सर्वात उंच शिखर असून त्याची उंची ४,८०८ मी ( १५,७७४ फुट) इतकी आहे. मॅटरहॉर्न हे देखील आल्प्समधील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे.

पुरातन काळापासून आल्प्समध्ये मानवी वस्ती असल्याचे पुरावे आढळले आहेत. रोमन लोकांची येथे वसाहत होती व हॅनिबल ह्या महान योद्ध्याने आल्प्समधून प्रवास केल्याचे मानले जाते.

आजच्या घटकेला १.४ कोटी लोक आल्प्स पर्वतरांगेमध्ये राहतात व दरवर्षी अंदाजे १२ कोटी पर्यटक येथे भेट देतात.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: